आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:भैरवनाथ सहकारी सोसायटी पुन्हा अण्णासाहेब शेलार यांच्या ताब्यात; नागवडेंच्या पॅनेलला सभासदांनी नाकारले

श्रीगोंदे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सोसायटी निवडणुकीत भैरवनाथ सहकार विकास पॅनलने बाजी मारत सर्व १३ जागांवर विजय मिळवला.

भैरवनाथ सोसायटी निवडणुकीसाठी एकूण २९२९ मतदारांपैकी २५९३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अण्णासाहेब शेलार यांच्या ताब्यातून सोसायटी काढून घ्या, लागेल ती रसद पुरवण्याची ग्वाही नागवडे यांनी काही दिवसापूर्वी बेलवंडी येथील एका कार्यक्रमात दिली होती. तेव्हापासून शेलार यांनी कंबर कसली होती. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा काहींना होती.

परंतु शेलार यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक बिनविरोध न करण्याची भूमिका घेऊन नागवडेना भुईसपाट करण्याची रणनीती आखली. या निवडणुकीची प्रचाराची धुरा अण्णासाहेब शेलार यांचे चिरंजीव ऋषिकेश शेलार यांनी सांभाळत रोज १५० ते २०० तरुण युवकांना सोबत घेऊन प्रत्येक सभासद व शेतकरी यांच्याशी भेटून सोसायटीच्या पारदर्शक कारभाराचा आलेख सभासदांसमोर मांडला. त्यास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याने विरिधकांना ऋषिकेश शेलारांवर टीका करण्याची वेळ आली. तसेच नागवडे यांनी मोठ्या प्रमाणात अर्थिक रसद पुरवून देखील सभासदांनी त्यांच्या पॅनलला नाकारल्याने शेलार यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले. या निवडणुकीत सोसायटीचे माजी चेअरमन दिनेश इथापे, ग्रामपंचायत सदस्य डॉ. अशोक शेलार, रामदास लबडे यांचा दारुण पराभव झाला.

उमेदवार आणि मिळालेली मते पुढीलप्रमाणे : बापू पांडुरंग घोडेकर १६९२, विजय अंकुश काळाणे १६८८, जयसिंग बाजीराव लबडे १६८८, शरद बापुराव इथापे १६६५, गंगाराम ज्ञानदेव हिरवे १६५६, आश्रू दत्तू डाके १६४३, ज्ञानदेव विठोबा शेलार १६२६, सुखदेव राघू लाढाणे १६१५, स्वाती गोरक्ष लबडे १७४३, अनिता भगवान वैद्य १६७५, नामदेव भगवान साळवे १७४९, साहेबराव लहानू शेलार १६९५, संतोष लहानू वाघमोडे १७५७ असे निवडून आले.

बातम्या आणखी आहेत...