आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यालयात प्रथम:भक्ती चराटे 94 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम ; दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर

राहुरी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इयत्ता दहावीच्या निकालात राहुरीच्या विद्यामंदिर प्रशालेची भक्ती चराटे ही विद्यार्थिनी ९४ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

भक्ती चराटे या विद्यार्थीनीला ४७० गुण,अपुर्वा महिंद्रकर ४५७ गुण, सार्थक वराळे या विद्यार्थ्याला ४४७ गुण मिळाले आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक तसेच सर्व विषयातील शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक कैलास अनाप,पर्यवेक्षक पारस जैन,आर. जे.पवार सह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...