आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:भंडारदरा धरणाचे कार्यालय श्रीरामपुरात स्थलांतरित करणार ;  महसूल मंत्री विखे

श्रीरामपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण स्वतः जलसंपदा मत्र्यांशी चर्चा करून एक समिती गठीत करू व कुकडी प्रकल्पाचे कार्यालय श्रीगोद्याला, मुळा प्रकल्पाचे कार्यालय राहुरीला तसेच भंडारदरा धरणाचे कार्यालय श्रीरामपूर स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीने एप्रिल २०१९ मध्ये मंत्रालयात जाऊन तत्कालीन पाटबंधारे सचिवांना प्रवरा सिंचन विभाग कार्यालय म्हणजेच अहमदनगर पाटबंधारे विभाग कार्यालय भंडारदरा लाभक्षेत्रात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती.

मात्र कोरोनामुळे काहीच कार्यवाही न झाल्याने समितीचे सुरेश पांडुरंग ताके, जितेंद्र भोसले, दत्तात्रय लिप्टे, रामचंद्र पटारे, भरत आसने, दिलीप गलांडे, किशोर पाटील, ईश्वर दरंदले, राजेंद्र भांड, संदीप गवारे, महेश लवांडे, रावसाहेब गलांडे, संजय नाईक आदीनी महसूलमंत्री विखे पाटील यांची भेट घेऊन पुन्हा एकदा मागणी केली आहे. त्याचबरोबर २०११ ते २०१५ या काळात संपूर्ण महाराष्ट्रात भिषण दुष्काळ होता, त्यात चार वेळा जायकवाडीसाठी गरज असताना किंवा नसताना केवळ कायद्याची अंमलबजावणी करायची म्हणून पाणी सोडले गेले. त्यात या वार्षिक शेती पद्धतीचे लाभक्षेत्राचे नुकसान झाले. त्यातूनच शेतकरी पूर्वी ब्लॉकधारक होते ते थकबाकीदार झाले. त्यांची बाकी शासनाने माफ करावी आणि तुम्ही जर तो आग्रह शासनाकडे धरला, तर सरकार ही बाकी माफ करू शकते. हा दोन-चार तालुक्यांच्या काही गावांचा विषय आहे, अशीही मागणी केली. त्यावर या विषयाची मागणी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...