आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभाग:भेंडे-गोंडेगाव रस्त्याचे काम दर्जाहीन; बांधकामचे दुर्लक्ष

कुकाणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भेंडे- गोंडेगाव- सलाबतपूर या रस्त्याचे काम रखडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा यास कारणीभूत आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरु असलेले हे काम बांधकाम विभाग व संबंधीत ठेकेदारामुळे प्रलंबित राहिलेले आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी या ठेकेदारास त्वरित काम पूर्ण करुन घ्यावे, अन्यथा भाजप नेवासे तालुक्याच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नेवासे तालुका भाजपने दिला आहे.

गोंडेगाव ते भेंडे या रस्त्याचे काम तीन-चार वर्षांपासून चालू केले. परंतु ते अजूनही पूर्ण झालेले नाही. जे काम झालेले आहे. ते निकृष्ट दर्जाचे आहे. या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने डोळेझाकपणा केलेला आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही हा रस्ता पूर्ण होत नाही भेंडे ते भेंडे खुर्द हा रस्ताही कारखान्यामुळे खूप रहदारीचा आहे. मात्र त्याचीही अवस्था अशीच आहे. तसेच या रस्त्यावर भेंडे येथे संत नागेबाबांचे मंदिर आहे. त्या मंदिरात श्रावणात दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. हा रस्ता महत्त्वाचा आहे. येत्या १५ ऑगस्टला तिसऱ्या श्रावण सोमवारी संत नागेबाबांची यात्रा भरत असते.

या काळात यामंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. परंतु ठेकेदाराने सहा महिन्यापासून या रस्त्यावरच्या दोन्ही बाजूला खडीचे ढिग टाकून ठेवल्याने रहदारीला अडचण येत आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांनी या ठेकेदारास त्वरित काम पूर्ण करुन घ्यावे, अन्यथा भाजप नेवासे तालुक्याच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी ही सार्वजनिक बांधकाम खाते नेवासे यांची राहील, असा इशारा भाजप नेवासे तालुक्याच्या वतीने देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...