आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपकुलगुरूंकडून जागेची पाहणी:बाबुर्डी घुमट येथील विद्यापीठ उपकेंद्राचे ६ सप्टेंबरला भूमिपूजन; राज्यपालांची उपस्थिती

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे साकारत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी उपकुलगुरु संजय सोनवणे यांनी केली. ६ सप्टेंबर रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर सोनवणे यांनी बाबुर्डी घुमटला भेट देऊन नियोजित उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येईल, असे ते म्हणाले.यावेळी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच नमिता पंचमुख व उपसरपंच तानाजी परभणे यांनी सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब चव्हाण, बाबासाहेब परभणे, सोनू मुंजाळ, पवन लांडगे, भाऊसाहेब लांडगे, रामलाल मोरे, उपस्थित होते.

तसेच महादेव गवळी, राहुल पंचमुख, संतोष चव्हाण, पोपट चव्हाण, शरद भगत, अंकुश परभणे, सुभाष परभणे, बन्सी परभणे, संजू गुंड, संदिप परभणे, बाळासाहेब परभणे, गंगाधर कोतकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच परभणे यांनी पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्र उभारणीसाठी ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण सहकार्य राहणार असल्याचे स्पष्ट केले. उपकुलगुरु सोनवणे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राचे काम लवकर सुरू होणार आहे. यासाठी तीन कोटींचा निधी आला आहे. दोन ते तीन वर्षात शंभर ते दोनशे कोटीचा निधी येणार आहे.बाबुर्डीचे पूर्ण स्वरूप बदलणार आहे. शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येणार असून, गावाच्या योगदानात देखील सहकार्य केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर मुळा डॅमचे पाणी गावाला मिळण्यासाठी नवीन पाईपलाईनचा प्रस्ताव ठेवला असून, याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...