आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहराचा विकास साधणार:शादीखाना सभागृहाचे आमदार गडाख यांच्या हस्ते भूमिपूजन

नेवासे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे येथील मुस्लिम समाजाच्या ईदगाह मैदानावरील बहुउद्देशीय शादीखाना सभागृहासह विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. सर्वांना बरोबर घेऊन नेवासे शहराचा विकास साधणार त्यासाठी साथ मला द्या, निधी उपलब्ध करून देण्यासाठी पद पणाला लावण्याची माझी तयारी असल्याचे प्रतिपादन आमदार शंकरराव गडाख यांनी यावेळी बोलताना केले.

नेवासे येथील ईदगाह मैदानावर झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे मार्गदर्शक रहेमततुल्लाखान पठाण हे होते. गफूरभाई बागवान, अॅड. एम. आय. पठाण, ईदगाह कब्रस्थान स्ट्रटचे अध्यक्ष रहेमानभाई पिंजारी, जुम्माखान पठाण, जब्बारभाई शेख, आष्टी येथील खलीलखान साब, रामभाऊ जगताप, उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप, नंदकुमार पाटील, संभाजीराव कार्ले, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महंमदभाई आतार, राजमहंमद शेख, अस्लमभाई मन्सुरी, महंमदभाई टेलर, मुसाभाई शेख, सतीश चुत्तर, नगरसेवक असिफभाई पठाण, अल्ताफ पठाण, इम्रान दारुवाले उपस्थित होते. प्रारंभी नेवासे ईदगाह कब्रस्थान स्ट्रटचे अध्यक्ष रहेमानभाई पिंजारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार शंकरराव गडाख यांनी निकाह सभागृहासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल गडाख यांचे मुस्लिम बांधवांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...