आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणगाैरव:शेवगावच्या भूमिपुत्रांनी राज्य व देशात‎ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला

शेवगाव‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : गणेश देशपांडे.‎ - Divya Marathi
छाया : गणेश देशपांडे.‎

शेवगावच्या विविध भूमीपुत्रांनी राज्यासह‎ संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या पदावर‎ आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला‎ आहे. त्यांना शिवजयंती निमित्त शेवगाव‎ भूषण पुरस्कार देऊन सन्मानित‎ करण्याच्या उपक्रमामुळे मनसे व‎ भाजपच्या वतीने छत्रपती शिवाजी‎ महाराजांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे‎ नेण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन‎ आमदार मोनिका राजळे यांनी केले.‎ शेवगाव येथे मनसे व भाजप शेवगाव‎ तालुका यांच्या वतीने तिथीनुसार‎ सार्वजनिक शिवजयंती उत्सवानिमित्त‎ आयोजित महाराष्ट्राची लोकधारा व‎ शेवगाव भूषण पुरस्कार सोहळ्याचे‎ आयोजन करण्यात आले होते. यावेळी‎ त्या बोलत होत्या. यावेळी मनसेचे नेते‎ दिलीप धोत्रे, मनसेचे जिल्हाध्यक्ष‎ देविदास खेडकर, बाप्पूसाहेब भोसले,‎ नगरसेवक महेश फलके, गणेश कोरडे,‎ पोलिस उपनिरीक्षक विश्वास पावरा,‎ मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे,‎ भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील रासने, दिलीप‎ सुपारे, गोकुळ भागवत, वसुधा‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सावरकर, किरण पुरनाळे आदी उपस्थित‎ होते.

शेवगाव भूषण पुरस्कार पोलिस‎ अधीक्षक तेजस्विनी सातपुते, अप्पर‎ पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे,‎ अर्थतज्ञ डी. एस. काटे, रेणुकामाता‎ मल्टीस्टेटचे प्रमुख प्रशांत भालेराव,‎ उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल‎ धस, तहसीलदार संतोष काकडे, पत्रकार‎ कैलास बुधवंत, सचिन सातपुते, पोलिस‎ उपनिरीक्षक पूजा अंधारे, नाट्य‎ दिग्दर्शक उमेश घेवरीकर, सावली‎ दिव्यांग संघटनेचे चांद शेख, महाराष्ट्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ खो-खो संघाचा कर्णधार नरेंद्र कातकडे,‎ राष्ट्रीय खो-खो खेळाडू शिवम बामदळे,‎ डॉ. नितीन नागरगोजे, युवा उद्योजक‎ जयप्रकाश धूत, चित्रकार सुरेश तेलुरे,‎ सामाजिक कार्यकर्ते गौरी व कृष्णा‎ महाराज कुऱ्हे, प्रगतशील शेतकरी‎ अप्पासाहेब रहाटळ आदींना शेवगाव‎ भुषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात‎ आले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी‎ संदीप खरड, डॉ. नीरज लांडे, संतोष‎ कगंनकर, ओंकार दगडे, गणेश‎ डोमकावळे, रामेश्वर बलिया, ज्ञानेश्वर‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ कुसळकर, सुरज कुसळकर, संजय‎ वणवे, बाप्पू धनवडे, नवनाथ कवडे,‎ जगदीश धूत, डॉ. कृष्णा देहाडराय,‎ देविदास हुशार, संदीप जावळे, प्रसाद‎ लिंगे, गोपाल महाजन, ओंकार मडके,‎ संदीप देशमुख, विठ्ठल दुधाळ, संजय‎ बोरुडे, मंगेश लोंढे, बाळा वाघ, अमिन‎ सय्यद आदींनी प्रयत्न केले. प्रास्तविक‎ मनसेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे‎ यांनी केले. सूत्रसंचालन दीपक‎ कुसळकर यांनी केले. वसुधा सावरकर‎ यांनी आभार मानले.‎

विधायक उपक्रमाचे आचरण‎
यावेळी राम महाराज झिंजुर्के म्हणाले,‎ शिवछत्रपतींचे विचार विधायक‎ उपक्रमातून आचरणात आणल्याशिवाय‎ समाजाची प्रगती होऊ शकत नाही.‎ शिवजंयती उत्सवानिमीत्त अनावश्यक‎ गोष्टींना फाटा देऊन समाजात चांगले‎ काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे हे‎ सकारात्मक ऊर्जा निर्मितीसाठी‎ आवश्यक आहे, असे त्यांनी यावेळी‎ सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने‎ नागरिक उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...