आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगर:शिर्डीत प्रवेश करण्यापूर्वीच तृप्ती देसाईंना पोलिसांनी अडवले, तृप्ती देसाई म्हणाल्या - 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय'

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिर्डीच्या 100 किमी आधीच पोलिसांनी तृप्ती देसाईंना त्यांच्या ताब्यात घेतले.

भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांना शिर्डीच्या प्रांताधिकाऱ्यांनी तीन दिवस शिर्डीमध्ये प्रवेशबंदी घातली आहे. मात्र तरीही तो आदेश मोडून शिर्डीत येण्याची तयारी देसाईंनी केली. तृप्ती देसाई आज सकाळीच शिर्डीसाठी रवाना झाल्या होत्या. मात्र, शिर्डीत प्रवेश करण्यापूर्वीच त्यांना सूपा टोलनाक्या जवळ पोलिसांनी रोखले आहे.

पोलिसांनी तृप्ती देसाईंना ताब्यात घेतले आहे. कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलिसांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. तृप्ती देसाई यांना सुपे पोलिस ठाण्यात नेले आहे. सुपा पोलिस स्टेशनचे प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले आहे. माध्यमांनाही येथे जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

शिर्डीच्या 100 किमी आधीच पोलिसांनी तृप्ती देसाईंना त्यांच्या समर्थकांसह ताब्यात घेतले. यावेळी तृप्ती देसाई समर्थक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली असल्याची माहिती आहे. तृप्ती देसाई म्हणाल्या की, 'आम्ही आमच्या हक्काने अधिकारासाठी लढतोय. आज मानवी हक्क दिन आहे आणि त्याच दिवशी आमचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होतोय हे दुर्दैवी असल्याचे तृप्ती देसाई म्हणाल्या आहेत.

प्रकरण काय?
'साई मंदिरात येताना भारतीय पेहरावात यावे. तोकडे कपडे घालून येऊ नये' असे आवाहन साई संस्थानने केले. यावर तृप्ती देसाईंनी आक्षेप घेत आक्रमक भूमिका घेतली आहे. साई संस्थानने मंदिर परिसरात पेहरावा संबंधिच्या नियमांचे फलक लावले. देसाई यांनी साई संस्थानने लावलेले हे फलक हटवावे अशी मागणी केली. साई संस्थानने फलक काढला नाही, तर आपण स्वत: जाऊन फलक हटविण्याचा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला. त्यानंतर शिर्डी पोलिसांनी तृप्ती देसाई यांना सुरक्षेच्या कारणास्तव 8 ते 11 डिसेंबरमध्ये शिर्डीत प्रवेश बंदीची नोटीस पाठवली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser