आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:नगर पालिकेच्या प्रभाग 7 मध्ये विकास कामांचे भूमिपूजन

श्रीगोंदे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​तालुक्यातील अनेक कालखंडापासून दुर्लक्षित असलेल्या सिद्धार्थनगर ससाने नगर मधील विकास कामांना नगरसेविका सोनाली घोडके यांच्या पाठपुराव्याने गती येऊ लागलेली आहे. रखडलेली विविध काम आता मार्गी लागताना दिसत आहेत. येथील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी श्रीगोंदे नगरपालिकेमार्फत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

माजी मंत्री धनंजय मुंढे यांनी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिलेल्या निधीमधील श्रीगोंदे पालिका हद्दीतील प्रभाग क्र .७ सिद्धार्थ नगर येथे पेव्हींग ब्लॉक बसवणे, प्रभाग क्र . ७ सिद्धार्थ नगर अंतर्गत दौंड, जामखेड रोड ते चंपालाल घोडके यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार राहुल जगताप, नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष संग्राम घोडके, मनोहर पोटे, सोनाली घोडके, निसार बेपारी, राजाभाऊ लोखंडे, अशोक खेंडके, बापू गोरे, प्रशांत गोरे, संतोष कोथिंबीरे, शहाजी खेतमाळीस, सतीश मखरे, समीर बोरा उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...