आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:शुक्रवारी इच्छामणी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचे भूमिपूजन ; भव्य गणेश मंदिर निर्माण करण्यात येणार

संगमनेर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवसाला पावणाऱ्या इच्छामणी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा जीर्णोद्धार व सत्संग भवनाचे भूमिपूजन शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता अगस्ती कॉर्नर (अकोले) येथे देवगड संस्थानचे मठाधिपती तथा विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय मार्गदर्शक समिती सदस्य भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. या मंदिर निर्मितीसाठी स्वर्गीय गंगूबाई सिताराम गिते यांनी दान दिलेल्या भूखंडावर भव्य गणेश मंदिर निर्माण करण्याचे कार्य विश्व हिंदू परिषदेने हाती घेतले आहे. मंदिर सर्वांना आवडते व्हावे. सर्व समाजाला हितकारक, दिशा देणारे व्हावे. संस्कृतीचे रक्षण करणारे व्हावे या पद्धतीने मंदिराची निर्मिती करण्यात येणार आहे. विहिंपचे केंद्रीय मंत्री तथा अखिल भारतीय सह सत्संग प्रमुख दादा वेदक, क्षेत्रीय मंत्री शंकर गायकर, धर्माचार्य संपर्क प्रमुख माधवदास राठी महाराज, प्रांत अध्यक्ष पांडुरंग राऊत यावेळी उपस्थित राहणार आहेत. भूमी पूजनानंतर संत दर्शन प्रवचन व धर्म सभा होणार असून गणेशभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन दिपक महाराज देशमुख, सुनील गिते, राहुल ढोक, सतिष नवले, कारभारी घोलप, बजरंग दलचे कुलदीप ठाकूर, भारत वाकचौरे, शिवाजी नवले, श्रीकांत भुजबळ, विजय भुजबळ, महेश नवले, विनायक साबळे, गोरक्ष भरीतकर, सुरेश साबळे, भरत नवले, संगीता जाधव, मंदा सोनवणे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...