आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे आज भूमिपूजन

लोणी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाढती विद्यार्थी संख्या व वाढती महाविद्यालयीन संख्या यांचा विचार करून आता नगर येथे उपकेंद्राचे भूमिपूजन मंगळवारी, ६ सप्टेंबर सकाळी १० वाजता उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते होत असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. राजेंद्र विखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. विखे म्हणाले, विद्यापीठाच्या अधिसभेत सिनेट सदस्य म्हणून काम करताना आम्ही सातत्याने पूर्ण क्षमतेने विद्यापीठाचे उपकेंद्र चालू झाले पाहिजे, अशी मागणी गेली वीस वर्षे करीत होतो. पण दहा वर्षांपूर्वी बांबूर्डी घुमट येथे जागा मिळण्यात आम्ही यशस्वी झालो, मात्र तरी निधी अभावी हे केंद्र उभे राहत नव्हते, मात्र आता मंत्री विखे व मंत्री पाटील या दोघांच्या प्रयत्नातून उपकेंद्र साकारत आहोत. या उपकेंद्राच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक यांना प्रशासकीय मदत होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. विखे यांनी यावेळी केले.

बातम्या आणखी आहेत...