आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास कामांचे भूमिपूजन समारंभ:ढवळगाव येथे 30 लाख रुपये खर्चांच्या विविध कामांचे भूमिपूजन

श्रीगोंदे11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले. - Divya Marathi
माजी आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते विविध कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

श्रीगोंदे तालुका येथील ढवळगाव येथे गावातील विविध विकास कामांचे भूमिपूजन समारंभ माजी आमदार राहुल जगताप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, कुकडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी देविकर यांच्या हस्ते ३० लाख रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमिपूजन झाले. घनश्याम शेलार यांनी ढवळगाव ग्रामपंचायत बिनविरोध केल्यामुळे पालकमंत्री यांनी बिनविरोध गावासाठी दिलेल्या बक्षिसामधून गावासाठी सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, मुस्लिम कब्रस्तान व हिंदू स्मशानभूमी सुशोभीकरण करण्यासाठी निधी तसेच खंडोबा मंदिरासमोर ब्लॉक बसवण्यासाठी २० लाख रुपये निधी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या निधीतून पाठपुरावा केला असून लवकरच तो निधी वर्ग होणार आहे म्हणून समस्थ ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी सरपंच सारिका शिंदे, उपसरपंच गणेश पानमंद, माजी सरपंच विजय शिंदे, माजी सरपंच भाऊसाहेब पानमंद, माजी सरपंच रवींद्र शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, माजी चेअरमन गौतम वाळुंज, माजी सरपंच तुकाराम बोरगे, ग्रामपंचायत सदस्य अजय वाळुंज, राम शिंदे , ग्रामपंचायत सदस्य बबन शिंदे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, राहुल बोरगे, अजित लोंढे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बोरगे, संचालक विविध कार्यकारी सोसायटी शिवाजी लोंढे मेजर, माजी उपसरपंच रामचंद्र लोंढे, माजी सरपंच माणिकराव ढवळे, दादा चव्हाण, नितीन शिंदे व विलास शिंदे, तात्या शिंदे, प्रवीण श्रीधर शिंदे, ग्रामसेविका महाडीक, प्रतीक्षा चव्हाण, नंदाबाई शिंदे, धोंडीबा कऱ्हे, शब्बीर पठाण, मोबीन पठान तसेच टिपू सुलतान ग्रूपचे सदस्य उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक रवींद्र शिंदे यांनी केले. माजी सरपंच विजय शिंदे यांनी आभार मानले.

माजी आमदार राहुल जगताप यांची प्रमुख उपस्थिती

बातम्या आणखी आहेत...