आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर जिल्ह्यातील ‘ब’ यादीतील ५ हजार ६०१ व ‘ड’ यादितील ४ हजार २१६ लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा नसल्याने, या लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी बुधवारी (८ जून ) जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पारनेर तालुक्यातील हंगा येथे भुमीशोध अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या जागेची पाहणी करून आवास प्लस ‘इ’ यादीतील हंगा गावातील १३ भुमीहिन लाभार्थीना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी त्याचठिकाणी जागेची पडताळणी केली व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना भुमीहिन लाभार्थीसाठी भुमशोध अभियानामध्ये भुमीहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देशित केले. हे अभियान १० ते २५ जून या कालावधीत राबवण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक जातनिहाय सर्वेक्षण या ‘ब’ यादीतील एकूण ४७ हजार ६५८ लाभार्थी पात्र अाहेत. यापैकी ४१ हजार ९८५ लाभार्थीच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली आहे. अद्याप ५ हजार ६७३ लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी मंजुरी देणे प्रलंबित आहे. ५ हजार ६७३ लाभार्थीपैकी ५ हजार ६०१ लाभार्थीना घरकुल बांधकामासाठी स्वमालकीची जागा उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे आवास प्लसच्या ‘ड’ यादीत एकूण ४ हजार २१६ लाभार्थीना जागा उपलब्ध नसल्याने मंजुरी देता आली नाही. सदर लाभार्थीना जागा शोध मोहिम राबविण्यासाठी अभियान कालावधीत गावनिहाय पंचायत समिती स्तरावरुन एका कर्मचारी/इतर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. शंभर लाभार्थींसाठी विस्तार अधिकारी/सक्षम अधिकारी दर्जाचा एक पर्यवेक्षीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार आहे. सदर कर्मचारी, अधिकारी गावामध्ये ग्रामपंचायत मालकीच्या जागेचा त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या खुल्या जागांचा शोध घेणार आहेत. भूमीहिन लाभार्थीना सदरील जागेवरील लाभार्थींचे अतिक्रमण नियमाकुल करुन २५ जूनपर्यंत जागा उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही भूमीशोध अभियानामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.