आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराजीचा सूर:पदवीधरच्या उमेदवारीवरुन भाजप निष्ठावंत-विखे समर्थकांत दुफळी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी नगरसेवक तथा विखे समर्थक म्हणून ओळख असलेले धनंजय जाधव यांनी नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारीची मागणी भाजपकडे केल्याने पक्षांतर्गत नाराजीचा सूर वाढला आहे. निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी तातडीने बैठक घेऊन पक्षातील निष्ठावंतांनाच पदवीधरसाठी उमेदवारी द्यावी अशी आग्रही मागणी लावून धरल्याने भाजप निष्ठावंत व विखे समर्थकांत दुफळी निर्माण झाली आहे. या बैठकीचा अहवाल देखील थेट प्रदेश कार्यालयाला सादर केला आहे.

भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या नगर शहर पदाधिकाऱ्यांची पक्षाचे जिल्हा प्रभारी मनोज पांगारकर यांच्या उपस्थितीत व शहर भाजपचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या उमेदवारी संदर्भात कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी, पक्षाशी संबध नसलेल्या बाहेरील कोणालाही तिकीट देवू नये, अशी मागणी करत संतप्त भावना व्यक्त केल्या.

पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांना पक्षाने उमेदवारी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे म्हणाले, शहरातून नाशिक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतले आहेत. निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली कामास सुरवात केली आहे. पक्षाने उमेदवारीसाठी योग्य निर्णय घ्यावा. ज्यांनी भाजपचे संघटनात्मक काम करत पक्ष वाढवला. त्यांचाच विचार व्हावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदाधिकाऱ्यांच्या भावना वरिष्ठापर्यंत नेण्याची ग्वाही
यावेळी मनोज पांगारकर म्हणाले, नाशिक पदवीधर मतदारसंघातून भाजपचे तिकीट कोणाला मिळेल हा निर्णय पक्षाचे वरिष्ठ घेतील. पण शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या भावना मी नक्कीच प्रदेशाच्या वरिष्ठांपर्यंत पोहचविल. कार्यकर्ता सर्वसामान्य जनतेशी जोडला गेलेला असल्याने कार्यकर्त्याच्या भावना या जनता जनार्दनाच्या असतात म्हणून कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्याच पाहिजे, असे पांगरकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...