आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी:गटशेती उत्पादित शेतमालाचे मार्केटिंग केल्यास मोठा फायदा, मंत्री थोरात यांचे प्रतिपादन

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिकांच्या मुल्य साखळी विकासाचे महत्व लक्षात घेवून गटशेती व स्मार्ट योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळात राबवल्या जात आहे. सेंद्रिय व गुणवत्तापूर्ण फळे, भाजीपाल्यास ग्राहकांची मोठी मागणी आहे. शासन योजनांचा लाभ घेवून शेतमालाचे एकत्रीत पायाभूत सुविधांची उभारणी करा. यातून मार्केटींग केल्यास शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखाना कार्यस्थळावर रविवारी कृषी विभागाकडून आयोजित म्हाळुंगी परिसर आदिवासी शेतकरी गट फळभाज्या व मार्केटिंग प्रणालीच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, उपविभागीय कृषि अधिकारी सुधाकर बोराळे, तहसिलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, साईबाबा संस्थांचे विश्वस्त ॲड. सुहास आहेर, जयहिंदचे कृषी विभाग प्रमुख डॉ. अभय जोंधळे, म्हाळूंगी परिसर आदिवासी शेतकरी गटाचे युवराज डामसे, धनाजी अस्वले, महादू अस्वले, डॉ. निलेश दिक्षीत, महादू अस्वले, प्रकाश नाडेकर, रोहीदास उघडे, राजेंद्र अस्वले, दत्तू अस्वले यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी गटशेतीस प्रोत्साहन देण्यासाठी म्हाळुंगी परिसर आदिवासी शेतकरी गटाच्या शीत वाहनाचे लोकार्पण करण्यात आले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले, सेंद्रिय शेतीवर शेतकऱ्यांनी भर दिला पाहिजे. सेंद्रिय भाजीपाला व फळांना शहरासह ग्रामीण भागात मोठी मागणी आहे. मागणी तसा पुरवठा हा उद्देश शेतकऱ्यांनी ठेवावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले. तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी आभार मानले.

गटशेतीच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक रूप
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार शेतकरी व गोरगरिबांच्या विकासासाठी काम करत आहे. अनेक संकटात सरकारने शेतकऱ्यांना चांगल्या योजनांचा लाभ दिला. गटशेतीच्या माध्यमातून शेतीला व्यावसायिक रूप येत आहे. सेंद्रिय पद्धतीच्या भाजीपाल्याला मोठी मागणी असल्याने मार्केटिंग केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...