आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकस्मात मृत्यूची नोंद:मिस्कीन मळ्यात म्हशीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दुचाकीला म्हशींची धडक बसून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला. विवेक विक्रम गायकवाड (वय २६ रा. निलक्रांती चौक) असे मयत तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा विवेकचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने या मृत्यूची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे, अशी मागणी मयत युवकाच्या आईने केली आहे.

मंगळवारी सायंकाळी विवेक हा दुचाकीवरून मिस्कीन मळा येथून जात असताना म्हशीच्या धडकेत त्याच्या डोक्याला मार लागला. त्याला एका रिक्षा चालकाने खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. बुधवारी सकाळी विवेकचा मृतदेह जिल्हा शासकीय रूग्णालयात शवविच्छेदनसाठी आणला असता नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. सी. मुजावर, सहाय्यक निरीक्षक नितीन रणदिवे, पोलिस अंमलदार महेश विधाते, बाबासाहेब गुंजाळ, मरकड यांनी भेट दिली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुजावर करीत आहेत. दरम्यान, तरूणाच्या मृत्यूबाबत त्याच्या नातेवाईकांनी शंका उपस्थित केली आहे. त्याची आई भारती गायकवाड यांनी पोलिसांना निवेदन दिले आहे. मुलगा विवेकचा मृत्यू संशयास्पद वाटत असल्याने या मृत्यूची चौकशी अधिकाऱ्यांमार्फत झाली पाहिजे. विवेकच्या मृत्यूचे काही साक्षीदार असून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी म्हशी मागे असलेल्या मुलांवर संशय व्यक्त केला आहे.

बातम्या आणखी आहेत...