आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कंटेनरच्या धडकेत‎ दुचाकीस्वार ठार‎

अकोले22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजूरच्या दिशेने जात‎ असलेल्या एका कंटेनरला कोल्हार‎ घोटी राज्यमार्गावर शहरातील विजय‎ साॅ मिल समोरून शहरातील महात्मा‎ फुले चाैकाच्या दिशेने दुचाकीवरून‎ जात असलेला दुचाकीस्वार‎ परप्रांतीय मजूर धडकून झालेल्या‎ अपघातात ठार झाला. हा अपघात‎ बुधवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या‎ सुमारास घडला. दुचाकीस्वाराच्या‎ अंगातील कपड्यांवर होळी‎ खेळल्याने रंग लागले होते.

त्याचे‎ दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने तो‎ कंटेनरच्या पुढील टायरला धडकून‎ थोडा बाजूला गेला, पण पुन्हा त्याची‎ दुचाकी कंटेनरच्या मागील‎ टायरखाली आली व दुचाकीस्वार‎ दुचाकीवरून खाली पडल्यानंतर‎ कंटेनरचे चाक थेट त्याच्या‎ डोक्यावरून गेल्याने त्यात त्याचा‎ मृत्यू झाला. या मजुराचे वय सुमारे ३०‎ असून त्याचे नाव मित्तल चव्हाण‎ असे आहे.‎

बातम्या आणखी आहेत...