आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पाकिस्तानच्या बिलावल भुट्टोचा कर्जतमध्ये भाजपकडून निषेध

कर्जतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी खालच्या पातळीवर टीका केली. माजी मंत्री आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत भाजपाच्याने भुट्टोच्या फोटोस जोडे मारत आणि पाकिस्तानचा ध्वज जाळत निषेध केला. शनिवारी, दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता शिंदे यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्जत भाजपाच्या वतीने भुट्टोच्या फोटोस जोडे मारण्यात आले. यासह पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष केला. तर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, तालुकाध्यक्ष सुनील गावडे, अशोक खेडकर, जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, किसान मोर्चाचे सुनील यादव, उमेश जेवरे, अनिल गदादे, शेखर खरमरे, बंटी यादव, राहुल निंभोरे, पप्पूशेठ धोदाड, विनोद दळवी, आरती थोरात,सरपंच काकासाहेब धांडे, शोएब काझी, गणेश जंजिरे, संतोष निंबाळकर, सुनील काळे, भाऊसाहेब गावडे, प्रशांत शिंदे, रोहित ढेरे, अजित अनारसे, अमोल मांडगे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...