आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेगारी:बिंगो जुगारावर छापेमारी, भिंगारला तीन ठिकाणी कारवाई; सात जणांविरुद्ध गुन्हा

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंगार कॅम्प पोलिसांनी शनिवारी भिंगार शहर व परिसरात तीन ठिकाणी सुरू असलेल्या बिंगो जुगारावर छापे टाकून कारवाई केली. याप्रकरणी तीन स्वतंत्र फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गवळीवाडा येथे पाण्याच्या टाकीजवळ बिंगो जुगार खेळविनाऱ्या आकाश चंद्रकांत घोरपडे (वय २८, रा. सदर बाजार, भिंगार) याच्यावर दुपारी दीड वाजता कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलिसांनी एलईडी, रोख रक्कम असा १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोना भानूदास गौतम खेडकर यांच्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकाँ व्ही. आर. गारूडकर तपास करत आहेत. याच ठिकाणी रवि शंकर परदेशी (वय ४१, गवळीवाडा, भिंगार) याच्यावरही सायंकाळी साडेपाच वाजता कारवाई करण्यात आली. एलईडी, रोख रक्कम व लॅपटॉप असा ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोना राहुल तात्यासाहेब गोरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पी.ए. बारगजे हे करत आहेत.

नगर-पाथर्डी रोडवरील दक्षिणमुखी हनुमान मंदीराजवळ पत्र्याचे शेडमध्ये सुरू असलेल्या बिंगो जुगारावर दुपारी साडेतीन वाजता कारवाई करण्यात आली. रोख रक्कम, मोबाईल, एलईडी स्क्रीन असा ८३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोना भानूदास गौतम खेडकर यांच्या फिर्यादीवरून विशाल अनिल डुकरे (वय २१, रा. वडारवाडी, भिंगार), श्रेयस सुनिल इवळे (वय २४, रा. इवळे मळा, सारसनगर), संकेत राजेश दळवी (वय २२, रा.बुऱ्हाणनगर), श्रीकांत बाळासाहेब शेलार (वय २४, रा. नागरदेवळे), रविंद्र मच्छिंद्र आळकुटे (वय ३०, रा. वडारवाडी, भिंगार) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहेकॉ जे. एन. आव्हाड तपास करत आहेत. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या कारवाया केल्या.

बातम्या आणखी आहेत...