आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात बर्ड चे मोठे योगदान; मसापचे तालुकाध्यक्ष अविनाश मंत्री यांचे प्रतिपादन

पाथर्डी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व तालुक्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व निसर्ग परिचयाच्या बाबतीत बर्ड संस्थेचे संचालक डॉ. दीपक देशमुख कुटुंबाचे योगदान अग्रस्थानी आहे. माणसाने निसर्गाशी संवाद साधत आदर्श जीवन शैली साधत डॉ. देशमुख यांनी अनेकांना प्रेरित केले, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष तथा वनदेव मित्र मंडळाचे अध्यक्ष अविनाश मंत्री यांनी व्यक्त केले.

कृष्णा भोजनालय सभागृहात ग्रीन वॉरियर्स पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी समर्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले, जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोटकर, डॉ. मनीषा देशमुख, सिद्ध समाधी योग च्या साधिका शोभा भागवत, निसर्ग कवी सचिन चव्हाण, सुखदेव मर्दाने, अंबादास साठे, डॉ शिरीष जोशी आदी उपस्थित होते. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मागील वर्षी वृक्षारोपण केलेल्या झाडांचे जतन करून त्यांची वाढ केली अशा सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना ग्रीन वॉरियर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी २०० झाडे अशा पद्धतीने वाढवली असून एक हजार झाडांचे अशा पद्धतीने संवर्धन करण्याचा संयोजकाचा मानस आहे.

अविनाश मंत्री म्हणाले, एक पाऊल हरित पाथर्डीकडे असा उपक्रम शहरात डॉ. देशमुख यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. अशा पद्धतीने उपक्रम राबवण्याने लहान वयातच मुलांच्या निसर्गा विषयी प्रेम वाढून वृक्षसंवर्धनाची गोडी वाढणार आहे. निसर्गाशी संवाद साधण्यासाठी शहरालगतच वनदेव निसर्ग केंद्र, विविध विद्यालयांचा परिसर, गर्भगिरी डोंगररांगाचा परिसर असून मुलांनी भटकंती करावी. झाडाझुडपांचा परिचय करून घ्यावा, असे ते म्हणाले. यावेळी विविध पुरस्कार्थींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रास्ताविक डॉ. शिरीष जोशी, स्वागत दीपक देशमुख यांनी केले. आभार भाऊसाहेब गोरे यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...