आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी योजना:जलजीवनच्या श्रेयवादावरून भाजप अन् राष्ट्रवादी रस्सीखेच ; आज दुसऱ्यांदा भूमिपूजन

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हाभरात पाणीपुरवठा योजनांची उभारणी करण्यात येत आहे. या पाणी योजनांचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असे म्हणत, भाजप खासदार सुजय विखे यांनी १३ दिवसांपूर्वी वांबोरी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन केले होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही याच योजनेच्या भूमिपूजनासाठी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्याच योजनेच्या भूमीपुजनाचे नियोजन आखले आहे. यानिमित्त जलजीवन मिशनच्या योजनांच्या श्रेयवादावरून राजकीय रस्सीखेच सुरू झाली आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील वांबोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे ४० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. राहुरी मतदारसंघातील वांबोरी हे मोठे बाजारपेठेचे गाव असून राहुरी मतदारसंघातील मतदानाचे मोठे पॉकेट आहे. विधानसभा तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्यावेळी वांबोरी पाणी योजना प्रचारातील प्रमुख मुद्दा होता. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजप व शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले. त्यानंतरही याच योजनेवरून श्रेयवादाचे राजकारण सुरूच आहे. जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती अॅड. सुभाष पाटील यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते वांबोरीत पाणी योजनेचे भूमिपूजन घडवून आणले. त्यावेळी खासदार विखे यांनी, पंतप्रधान मोदी यांच्या २०१९ च्या घोषणेची आठवण करून देत, विद्यमान व्यक्ती आमदार नसल्याचा टोला माजी मंत्री तनपुरे यांचे नाव न घेता लगावला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनेही स्वतंत्र भूमीपुजन करण्याचे नियोजन आखले. माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते शनिवारी हे भूमीपुजन करण्यात येणार आहे. याबाबत माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे म्हणाले, श्रेयवादाचा प्रश्नच नाही. स्वत:ला ज्येष्ठ म्हणवून घेणारेच आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत.

जिल्ह्यात ८२९ योजना
हर घर से जल उपक्रमांतर्गत हाती घेण्यात आलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रतिमानसी ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात ८२९ पाणी योजना होणार आहेत यासाठी सुमारे १,३१७ कोटी खर्च येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...