आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राम शिंदेंच्या उमेदवारीमुळे भाजपसह सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेही खुश; मतदारसंघाला दोन आमदार मिळणार

जामखेड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राम शिंदे यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही आनंद व्यक्त करीत आता आम्हाला देखील किंमत येणार आहे, अशा भावना व्यक्त केल्या. जामखेड कर्जत मतदारसंघाला वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या नंतर आता माजी पालकमंत्री शिंदे याच्या रूपाने विधानपरिषदेत जाण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मतदारसंघाला दोन आमदार मिळणार आहेत.

भाजपने शिंदे यांना संधी दिली आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे. आता त्यांना मतदारसंघात राहुनच काम करावे लागेल. विशेष बाब म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगरचे प्रभारी म्हणून जाहीर होताच भाजपचे पदाधिकारी सक्रिय झाले आहेत. सत्तांतर झाल्यामुळे विरोधात कोणीच बोलत नव्हते. ज्यावेळेस पक्षश्रेष्ठींचा आदेश येईपर्यंत कोणी काही बोलत नव्हते. शिंदे हे वरिष्ठ सभागृहात जाणार आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग देखील एकतर्फी वागणार नाहीत, आज अनेक कार्यालयात अधिकारी मनमानी कारभार करत आहे. याकडे कोणाचे लक्ष नाही जर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष दिले तर अधिकारी लोकप्रतिनिधींकडे तक्रार करतात. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते देखील शांत झाले आहेत. सध्याच्या परिस्थितीत अधिकारीच दोन्ही बाजूंनी कारभारी झाले आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्ष प्रबळ असेल तर सत्ताधारी देखील जमिनीवर राहतात आणि अधिकारी देखील एकतर्फी वागत नाही. त्यामुळे सर्वांना समान न्याय दिला जातो.

बातम्या आणखी आहेत...