आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्याच्या  वक्तव्याचा भाजपकडून निषेध

संगमनेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी याने भारत देशाबद्दल व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचा शहर व तालुका भाजपने निषेध केला. शनिवारी दुपारी संगमनेर बस स्थानकासमोर पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आंदोलन करण्यात आले. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

देशाचा विकास साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व घटकांना न्याय दिला आहे. मोदी जागतिक नेतृत्व आहे. अन्य राष्ट्रांनी ते स्वीकारल आहे. यामुळे पाकिस्तानचे पोट दुखत आहे. त्यांच्या खोडी काही थांबणार नाहीत, अशा प्रतिक्रिया पदाधिकाऱ्यांनी दिल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जयघोष करण्यात आला. जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर गुंजाळ, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिरिष मुळे, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, तालुकाध्यक्ष सतिश कानवडे, जालिंदर वाकचौरे, रोहिदास साबळे, रेष्मा खांडरे, कांचन ढोरे, दिनेश सोमाणी, सुनील खरे, दिपक भगत, भरत फटागंरे, कैलास भालेराव, जगन्नाथ शिंदे, साहेबराव वलवे, संतोष पठाडे व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...