आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:पाणीप्रश्नी भाजपचे नगरसेवक आक्रमक; शनिवारपर्यंत प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा, अनेक भागात पाण्याच्या समस्या

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात व उपनगर भागात मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक भागात पाण्याच्या समस्या आहेत. नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवकांनी माजी महापौर बाबासाहेब वाकळे व शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्तांची भेट घेऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यावेळी वाकळे, गंधे, उपमहापौर मालन ढोणे, रवींद्र बारस्कर, अजय चितळे, उदय कराळे, प्रदीप परदेशी, संजय ढोणे, बंटी ढापसे आदी उपस्थित होते. आयुक्त शंकर गोरे यांनी नगरसेवकांशी चर्चा करून सोमवारपासून मुळा धरण येथे नवीन पंप कार्यान्वित करण्यात येईल, शहरात व उपनगर भागात वॉलमनची मानधनावर लगेच नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन दिले. आश्वासनानुसार प्रश्न मार्गी न लागल्यास शनिवारपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...