आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Ahmednagar
  • BJP Corporator Controls 9 Gunthas In Pokhardi; Demand Of Rs 50 Lakh For Encroachment, Crime Against Eight Persons Including Corporator Swapnil Shinde | Marathi News

गून्हेवृत्त:पोखर्डीतील 9 गुंठे जागेवर भाजप नगरसेवकाचा ताबा; अतिक्रमण करून 50 लाख रुपयांची मागणी, नगरसेवक स्वप्नील शिंदेंसह आठ जणांवर गुन्हा

नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोखर्डी शिवारातील नऊ गुंठे जागेवर अधिकृतपणे तारेचे कंपाउंड करून जागेवर अतिक्रमण केले. अतिक्रमण काढण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३१ डिसेंबर २०२१ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

जागा मालक सुनंदा धुमाळ यांचे बंधू डॉ. प्रकाश दादासाहेब जाधव (रा.समतानगर, सावेडी) यांनी या प्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार नगरसेवक शिंदे, सचिन रोहिदास शिंदे, अनिल ढवण (रा.वैदुवाडी, सावेडी) व इतर पाच ते सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोखर्डी शिवारातील गट नंबर १७० मधील ९ गुंठे जागा ही सुनंदा धुमाळ यांच्या मालकीची आहे. आरोपींनी या जागेला अनधिकृतपणे तारेचे कंपाउंड करून त्या ठिकाणी ‘स्वप्निल’ नावाचा बोर्ड लावला. अतिक्रमण काढण्यासाठी जाधव यांच्याकडे ५० लाख रुपयांच्या रकमेची मागणी केली. त्यांना शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...