आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपरिषद मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांची तातडीने बदली करून त्यांनी केलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते हे जामखेडला रूजू झाल्यापासून वादग्रस्त ठरले आहेत. सूरूवातीपासुन मनमानी व एकाधिकारशाहीने कामकाज करत आहेत. आडमुठेपणामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. तसे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.
शहराचा विकास आराखड्यात हस्तक्षेप केल्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. प्रशासक काळात सर्व खर्चाची व अदा केलेल्या बिलांची चौकशी करावी. जामखेड नगरपरिषदेच्या मतदार यादी व प्रभाग रचना चुकीच्या बनवल्या. दैनंदिन व आठवडा बाजार कर लिलाव प्रक्रिया झालेली नाही. मात्र सक्तीने वसुली होत आहे. जागेच्या व घरांच्या नोंदीमध्ये फेरफार केले जात आहेत. सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, मोकाट जनावर पकडण्याच्या निविदांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.
अनधिकृत बांधकामांच्या शास्ती कर न लावता नोंदी लावल्या आहेत. नागरिकांना दिलेल्या वेळेत भेटत नाहीत, असेही निवेदनात म्हटले आहे. तहसीलदार विशाल चंद्रे यांना दिलेल्या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष बिभिषण धनवडे, नगरसेवक अमित चिंतामणी, गणेश आजबे, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, अर्जुन म्हेत्रे, मोहन गडदे, सलीम बागवान, नितीन धनवटे, अभिजीत राळेभात, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ. नितीन अनभुले, मनोज कुलकर्णी, गोरख घनवट, आदींच्या सह्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.