आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:अडीच वर्षांनंतर कर्जतमध्ये भाजपत उत्साह; कार्यकर्त्यांकडूनही जल्लोष

कर्जत3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषदेत विजय मिळवल्यानंतर माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे कर्जत तालुक्यात भाजपकडून जोरदार स्वागत करण्यात आले. सिद्धटेक येथील श्रीसिद्धीविनायकाचे दर्शन घेत आमदार राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. शिंदे यांचे विविध ठिकाणी जोरदार विजयी घोषणेने वाजत-गाजत मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. आमदार शिंदेंनी देखील सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद व्यक्त केले.

कर्जत शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ आमदार राम शिंदेंच्या विजयी मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी भाजपसह काही मित्र पक्षांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. महिला पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरला. आपल्या अडीच वर्षांच्या वनवासाची सांगता केली. विजयी घोषणेने महासती अक्काबाई मंदिरात दर्शन घेत विजयी मिरवणूक शहरात दाखल झाली. यावेळी शहरात ठिकठिकाणी आमदार राम शिंदेंचे स्वागत करीत पदाधिकाऱ्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि मुख्य रस्त्यावर दोन मोठे क्रेनच्या साह्याने भव्य फुलांच्या हारात आमदार राम शिंदेंना गुंफण्यात आले. शेवटी ग्रामदैवत संत श्रीसदगुरु गोदड महाराजांचे मंदिरात श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन विजयी मिरवणुकीची सांगता करण्यात आली आणि आमदार राम शिंदे चोंडीकडे रवाना झाले.

यावेळी आमदार राम शिंदे म्हणाले, संत श्रीसदगुरु गोदड महाराजाच्या कृपेने कर्जत-जामखेडमध्ये काम करण्याची पुन्हा संधी मिळाली. मंत्रिपदाच्या कार्यकाळात भरपूर विकास करीत मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र, गेल्या अडीच वर्षात जो आपला अभिमान आणि स्वाभिमान गहाण ठेवल्याची भावना सर्वसामान्य माणसांमध्ये निर्माण झाली होती, ती गोदड महाराजांनी आपल्या सर्वांची दुखणी ऐकून घेतली, असे आमदार शिंदे म्हणाले.

भाजपच्या नेतृत्वाने आपणास न्याय दिला भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्याच्या नेतृत्त्वाने आपल्याला न्यायिक भूमिका दिली. विधान परिषदेत आपल्याला संधी मिळाली. आज श्रीसंत गोदड महाराजाच्या दर्शनापूर्वीच राज्यातील महाविकास आघाडीच सरकार बरखास्त होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. महाराजाच्या भूमित अनैतिकता, अन्याय, अत्याचार चालत नाही, असे आमदार शिंदे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...