आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:भाजपने राजकारण करून महाराष्ट्राचा अवमान केला; राष्ट्रवादीतर्फे निषेध

श्रीरामपूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

देहू येथील संत तुकाराम महाराजांच्या शीळा मंदिर लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते झाला. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या स्वागताची जबाबदारी उपमुख्यमंत्री म्हणून व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांच्याकडे दिली होती. त्यांनी त्यानुसार ती जबाबदारी पार पाडली मात्र शिष्टाचारानुसार उपमुख्यमंत्री व पालकमंत्री म्हणून व्यासपीठावर पवार यांना भाषण करू न देण्याचे राजकारण भाजपने करून महाराष्ट्राचा अवमान केल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रीरामपुरात निषेध करण्यात आला.

याप्रसंगी माजी नगराध्यक्ष तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांची भाषणे झाली. याप्रसंगी डॉ. बापूसाहेब आदिक, पुष्पा कवडे, अरुण कवडे, जयश्री जगताप, सोनल मुथा, प्रियंका जनवेजा,जमुताई परदेशी,निशा थोरात, अँड.जयंत चौधरी,सुनील थोरात,योगेश जाधव, सागर कुऱ्हाडे, सोहेल शेख, तौफिक शेख, सैफ शेख, भास्कर ताके, गणेश ठाणगे, गोपाल वायनदेशकर, शुभम पवार, समित मुथा,हर्षल दांगट, जाकीर भाई, अक्रम शेख,इसाक शेख, जाकीर बागवान, फजल शेख, तौफिक कोथमिरे, कैवल्य लावंड ,ईश्वर चव्हाण, निरंजन भोसले आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...