आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्हाला सोडून दुसऱ्या बरोबर लग्नगाठ बांधणारे उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये, त्यांना ते शोभत नाही. त्यामुळे त्यांच्या मागे शनिदेव लागला आहे. अशी टीका भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी शुक्रवार (12 में) ला करून कर्नाटकामध्ये भाजपचे सरकार बहुमतात येईल असा विश्वास व्यक्त केला.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चोंडी (ता.जामखेड) येथे होणाऱ्या 299 जयंतीनिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमानिमित्त पूर्व तयारी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, कर्नाटक राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. शनिवारी या राज्याचा निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकमध्ये 125 ते 135 जागा मिळवून भाजप बहुमतात सत्तेवर येईल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत अनकल या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली होती. या कालावधीत प्रभारी म्हणून मी तिथे काम केले होते. कर्नाटकामध्ये 54 विधानसभा मतदारसंघात 54 पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. माझ्याकडे अनकल मतदारसंघाची जबाबदारी होती.
ते पुढे म्हणाले,आम्हाला सोडून दुसऱ्या बरोबर लग्नगाठ बांधणारे उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नये, त्यांना ते शोभत नाही. अगोदर त्यांनीच नैतिकता घालवली. यातूनच ते शनिदेवाला का आले ? हे समजून घ्यावे. त्यांना त्यांची चूक कळली असावी असा टोलाही त्यांनी लगावला. जनतेशी गद्दारी करून त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं.
शिंदे म्हणाले,सरकारला आता कुठलीच अडचण नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करतील.
–
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री 31 मे ला चोंडीत
३१ में ला चौंडी येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या होणाऱ्या जयंतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह केंद्रीय मंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थित राहणार असून, होळकर घराण्याचे वंशज तिसरे युवराज राजे होळकर देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. वाढता उष्णतेचा प्रकोप लक्षात घेऊन कार्यक्रम स्थळावर पाणी, जेवण व अन्य बाबी लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.असे शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.