आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण:कट्टर शिवसैनिक राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींसोबत येईल, भाजप खासदार सुजय विखे यांचा दावा

अहमदनगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुजय विखे - फाइल फोटो - Divya Marathi
सुजय विखे - फाइल फोटो
  • राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल, याचा महाविकास आघाडी सरकारवर परिणाम दिसेल

राम मंदिर भूमिपूजनावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या भूमिपूजनाचे निमंत्रण देण्यात आले आहे. या निमंत्रणावरुन महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगत आहे. दरम्यान राम मंदिराच्या मुद्द्यावरून सुजय विखे यांनी मोठा दावा केला आहे.

शिवसेनेच्या नेतृत्वाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला

सुजय विखे म्हणाले की, 'शिवसेनेच्या नेतृत्वाने आपला स्वाभिमान गहाण ठेवला असला तरीही शिवसेनेची स्थापन ज्यासाठी झाली, त्या राम मंदिराच्या मुद्द्यावर शिवसैनिकांनी आंदोलने केली होती, तुरुंगात गेली होती. ते सर्व कट्टर कार्यकर्ते हे राम मंदिरासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व स्वीकारतील, असा दावा सुजय विखे यांनी केला.

अहमदनगर जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी आंदोलन

राम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने मतपरिवर्तन होईल आणि याचा परिणाम महाविकास आघाडी सरकारवर दिसेल', असेही सुजय विखे म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यात खासदार सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...