आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात एकीकडे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरुन सामान्य जनेतला आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तर दुसरीकडे या दरवाढीचा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी अप्रत्यक्षपणे समर्थन केले आहे. पेट्रोल डीझेल महागले तर काय झाले, त्याबदल्यात मोफत सुविधा आणि लस मिळत आहे.
त्यामुळे इंधन दरवाढीविरोधात आंदोलनाचे फलक लावताना पंतप्रधान मोदी यांनी लस मोफत दिली त्याचादेखील फलक झळकवा. असा अजब युक्तीवाद भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे.
विखे फाउंडेशनच्या कार्यक्रमात केला युक्तीवाद
खासदार सुजय विखे पाटील हे विळद घाट येथील डॉ. विखे पाटील फाउंडेशन रुग्णालायचे अर्बन सेंटरच्या उद्घाटनप्रंसगी आले होते. यावेळी आमदार संग्राम पाटीलसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, खासदार सुजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा युक्तीवाद केला.
दरवाढीचे फलक लावताना मोदींचेही फलक लावा
काँग्रेसने राज्यात इंधन दरवाढीवरुन आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुजय विखे पाटील यांनी दरवाढीच्या बदल्यात मोफत सुविधा पाहाव्यात. केंद्र सरकार 35 हजार कोटी रुपये खर्च करुन मोफत लसीकरण मोहीम राबवत आहे. हे काम राज्य सरकारचे असून त्यांनी ते केले नाही. त्यामुळे इंधन दरवाढीच्या विरोधात फलक लावताना पंतप्रधानांनी मोफत लस दिली म्हणून त्याचेही फलक लावा असे सुजय विखे पाटील म्हणाले.
अपयश लपवण्यासाठी हे नाटक
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून आलबेल नसल्याचे दिसत आहे. परंतु, हे सर्व नाटक असून आपले अपयश झाकण्यासाठी ते करत आहे. यामुळे जनता आणि प्रसार माध्यमांचे लक्ष विचलित करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अस्तित्वाची लढाई म्हणून हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहे त्यामुळे ते सहजासहजी वेगळे होणार नसल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.