आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेवगावकरांना पाणीप्रश्नावर भाजप राष्ट्रवादी झुलवत ठेवून आपला कार्यभाग साधल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रा. किसन चव्हाण यांनी केला.
क्रांती चौक येथे गुरुवारी पाणी प्रश्न संदर्भात शहर बंद व दोन तास रास्ता रोको आंदोलन प्रा. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी वंचितचे निवेदन स्वीकारले त्यानंतर रास्ता रोको आंदोलन थांबवण्यात आले. पाणी प्रश्न सोडवण्यास संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल शेख,जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, पाथर्डी तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू म्हस्के, राजेंद्र नाईक, लक्ष्मण मोरे,सलीम जीलानी भीमा गायकवाड, विशाल इंगळे, विकी मगर, राजुभाई शेख, सागर हवाले, संतोष म्हस्के, अनिल गंगावणे चांदभाई शेख, रवी नीळ आदींची उपस्थिती होती. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शेवगाव शहरातील पाणी प्रश्न संदर्भात शहर बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शेवगावकरांनी पाठिंबा दिला.
प्रा. चव्हाण म्हणाले, ५० हजार लोकसंख्या असलेल्या शेवगाव शहराला हाकेच्या अंतरावर जायकवाडी धरण असून शेवगाव करांना १५ दिवसाला गाळमिश्रित दूषित गटारयुक्त पाणी मिळते. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. खास करून याचा सर्वात जास्त फटका लहान मुलांना बसत आहे.
एकमेकांचे नातलग असलेले राजळे घुले यांनी एकत्रित जाऊन महाराष्ट्र शासनाकडून पाणी प्रश्नासंदर्भात निधी आणायचा ठरवला तर हे काम काही क्षणात मार्गी लागेल मात्र त्यांना हा प्रश्न सातत्याने झुलता ठेवायचा आहे. सर्वसामान्य नागरिकांचे कसे हाल होतील यातच ते धन्यता मानतात. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत जनतेने चांगल्या काम करणाऱ्या लोकांना निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी प्यारेलाल शेख, अरविंद सोनटक्के आदींची भाषणे झाली. यावेळी रवी सर्जे सागर गरुड, दादा गाडेकर, गोरख वाघमारे, रोहिणी ठोंबे, मनीषा जावळे, रेश्मा गायकवाड गोरख तुपविहिरे, डॉ.अंकुश गायकवाड,अशोक बिडे, अजिनाथ आव्हाड, सौरभ काकडे, अजय फुंदे, बाळदेव फुंदे, सुनील जाधव, शाफिक शेख, विष्णू वाघमारे आदींनी रास्ता रोको आंदोलनात सहभाग घेतला.
नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार
पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी किंवा विरोधी पुढे येत नाहीत. फक्त आपला कार्यभाग साधत आहेत. नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार नगरपालिका प्रशासनाच्या वतीने चालला आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला असाच प्रकार सध्या शेवगाव शहर आणि परिसरात दिसून येतो. पाथर्डी सारख्या शहराला तीन दिवसाला नियमितपणे पाणी मिळते. मात्र तेच पाणी शेवगावकरांना मिळत नसल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.