आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्तासंघर्ष:सत्ता स्थापनेचा आमचा निर्णय योग्य असून तो घटनेला आणि कायद्याला धरूनच होता हे सिद्ध झाले - माधव भंडारी

अहमदनगर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील सत्ताधारी सरकारच्या अस्तिवाबाबत काय निर्णय लागतो याची पूर्ण राज्याला उत्कंठा होती. सुप्रीम कोर्टाने दिलेला निणर्य हा अपेक्षित व स्वागतार्ह आहे. सत्ता स्थापनेसाठी आमचा निर्णय योग्य असून तो घटनेला व कायद्याला धरूनच होता हे यावर सिद्ध झाले आहे. राज्यातील युतीच्या सरकारला कोणताही धोका नसणार, याची आम्हाला खात्री होती असे मत भाजपचे प्रवक्ते तथा उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केले.

अहमदनगरमध्ये गुरुवारी (11 मे) रोजी भारतीय जनता पक्षाच्या अहमदनगर शहर व ग्रामीण अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेसाठी प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी लक्ष्मी कारंजा चौकातील पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते.

घटनापीठासमोर पुढील निर्णय होणार आहे. याचे स्वागत करतो. त्यामुळे एका महत्वाच्या निर्णयावर छाननी व विश्लेषण होणार असल्याने त्यावर चर्चा करून आम्ही घटनापीठा समोर आमची बाजू मांडणार आहोत. आमच्या बाजूने न्याय मिळले याचा आम्हाला विश्वास असल्याचे माधव भंडारी म्हणाले.

अहमदनगर शहर भाजपच्या पुढील अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या बैठकीत विद्यमान अध्यक्ष भैय्या गंधे यांनी शहराच्या वतीने माधव भंडारी यांचे स्वागत केले. तसेच यावेळी प्रदेश कार्यकारणीवर नियुक्ती झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माधव भंडारी यांच्या हस्ते झाला. यामध्ये नूतन प्रदेश चिटणीस अरुण मुंढे, प्रदेश कार्यकारणी सदस्य अभय आगरकर, सुवेंद्र गांधी व निमंत्रित सदस्य किशोर वाकळे यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

माधव भंडारी म्हणाले, नगर शहर, ग्रामीण व उत्तर जिल्हाध्यक्ष नेमणूकीसाठी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यासाठी प्रदेशाने मला अहमदनगरला पाठवले आहे. पक्षाने राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांचे विचार मी वरिष्ठांपर्यत मी पोहोचवणार आहे.

भैय्या गंधे म्हणाले, गेले साडेतीन वर्ष मी पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी मी पार पडली आहे. आता नव्या अध्यक्ष निवडण्याची प्रकिया सुरु झाली आहे. नगर मधून प्रदेश कार्यकारणीत तीन नेत्यांची निवडा झाली आहे. मला सर्वांनी चांगली साथ दिल्याने मी काम करू शकलो याबद्दल सर्वांचे आभार मानतो.

यावेळी संघटन सरचिटणीस विवेक नाईक यांनी प्रास्ताविक केले. यावेळी ज्येष्ठ्नेते वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सचिन पारखी, महेश नामदे, संजय ढोणे, बंटी डापसे,तुषार पोटे, दिलीप भालसिंग, नितीन शेलार आदींसह मोठ्या संख्यने पदाधिकारी उपस्थित होते.