आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे चिंतन शिबिर:भाजपच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेसचे ‘भारत जोडो’ने उत्तर देणार, शिर्डीत प्रभारी एच. के . पाटलांची घोषणा

नगर | नवनाथ दिघेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेसच्या राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी चिंतन शिबिराला हजेरी लावली. - Divya Marathi
काँग्रेसच्या राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी चिंतन शिबिराला हजेरी लावली.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा मोदी सरकारने खेळखंडोबा केला आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच देशात द्वेष - मत्सराचे राजकारण अन‌् त्यासोबत ईडी, सीबीआय आणि राज्यपाल कार्यालयाला हाताशी धरून विरोधी पक्षातील नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. अशा स्थितीत केंद्रातील लोकशाही व जनविरोधी सरकार उलथून लावण्यासाठी राज्यातील काँग्रेसने सज्ज राहावे. भाजपच्या ‘भारत तोडो’ला काँग्रेस ‘भारत जोडो’ अभियानातून प्रत्युत्तर देत असून त्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

शिर्डी येथील प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या नवसंकल्प शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, शिवराज पाटील, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे,नितीन राऊत यांच्यासह राज्यातील कॉंग्रेसचे पदाधिकारी , लोकप्रतिनिधी उपस्थित होते.पाटील यांनी केंद्र सरकार आणि भाजपच्या धोरणांवर टीका केली. फाळणी, विध्वंस, अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस यशस्वी होऊ देणार नाही. त्यासाठीच पक्षाने देशव्यापी लढा उभारला आहे.या बैठकीतील विचारमंथनातून तयार होणाऱ्या मार्गानुसारच आगामी काळात वाटचाल करावी लागणार आहे. यापुढे पक्षात तरुण आणि महिलांनाही समान संधी देण्यात येणार आहे. गरीब, मध्यमवर्ग आणी वंचित घटकांना बरोबर घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातील लढ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले. आता यावर भाजपची काय प्रतिक्रिया असेल ते पहावे लागेल.

राज्यसभेबाबत असंतोष नाही
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या उमेदवाराबाबत कोणताही असंतोष नाही. पक्षात हायकमांडचा निर्णय अंतिम असतो. काही जणांनी नाराजी व्यक्त केली असली ती योग्य व्यासपीठावर दूर केली जाईल. काँग्रेसमध्ये लोकशाही असल्याचे हे द्योतक आहे. पक्षात भाजपसारखी हिटलरशाही नाही. मुंबईतील प्रभाग रचना चुकीची होत असल्याबद्दल आपण यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. येत्या राज्यसभा निवडणुकीत आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. मात्र या निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा कायम ठेवणे हे मात्र भाजपच्या हाती आहे .
-नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष

बातम्या आणखी आहेत...