आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना दीड कोटी रुपयांचा बोनस व सानुग्रह अनुदान

कोपरगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समता नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक घोडदौड पाहता दसरा, दिपावली निमित्त समताच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ३० टक्के बोनस आणि सानुग्रह अनुदान दसऱ्याच्या आदल्या दिवशीच देण्यात आले. समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांना बोनस व सानुग्रह अनुदानापोटी दीड कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी या रकमेचा चांगल्या पद्धतीने विनियोग करून आपल्या कुटुंबासमवेत दसरा आणि दिवाळीचा सण साजरा करावा, असे आवाहन केले.

मुख्य कार्यालयातील ठेव विभागप्रमुख संजय पारखे म्हणाले, अध्यक्ष काका कोयटे आणि संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देऊन दसऱ्याच्या आदल्या दिवशीच दिवाळी साजरी करण्याची संधी दिली. त्याबद्दल संचालक मंडळाचे आभारी आहोत. पुढील काळातही संस्थेच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने दिलेली जबाबदारी पार पाडू. पतसंस्थेने कर्मचाऱ्यांना ० टक्के व्याजदराने गृहकर्ज आणि वाहनकर्ज दिलेले आहे.

संस्थेचे संचालक संदीप कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली बदलते अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि कामकाजातील बदलत्या पद्धतीविषयी माहिती व्हावी, यासाठी वर्षातून दोन वेळेस प्रशिक्षण शिबीर आयोजित केले जाते. पतसंस्थेचे कर्मचारी शिक्षणाची पदवी पूर्ण नसली तरी समता देत असलेल्या प्रशिक्षणामुळे कोणत्याही बँकेतील किंवा पतसंस्थेमधील शाखाधिकारी करेल, असे काम करत आहे.

यावर्षी प्रत्येक कर्मचारी हा आनंदीत असून समता पतसंस्थेमध्ये आणि प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या घरात एक प्रकारे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी काका कोयटे, संचालक जितूभाई शहा, जनरल मॅनेजर सचिन भट्टड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...