आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यु आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने मराठी राजभाषा गौरव दिन आणि राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात वैचारिक, विज्ञानावर आधारित, कथा, कादंबऱ्या, तसेच शास्त्रज्ञांची पुस्तके मांडलेली होती. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, कला शाखा उपप्राचार्य बी. बी. सागडे, वाणिज्य शाखा उपप्राचार्य एस. बी. कळमकर ,विज्ञान शाखा उपप्राचार्य ए. ई. आठरे, ग्रंथालय समितीचे एच. डी. जगताप, ग्रंथपाल समिती प्रबंधक बी. के. साबळे, अधीक्षक हेमा कदम, अधीक्षक आर एन पाटील, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवक वृंद, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांनी ग्रंथालय विभागाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, ग्रंथालयात सुंदर वैचारिक ग्रंथ संग्रह आहे. ग्रंथ हे मनुष्याच्या जीवनाला मार्गदर्शक आहेत. आजच्या मोबाईल इंटरनेटच्या जगात वाचकांची संख्या कमी होत आहे. परंतु साहित्य वाचनाने व्यक्तीच्या जीवनात अमुलाग्र बदल होतो. त्यासाठी नियमित वाचन केले पाहिजे.
मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी भाषा व इतर अवांतर वाचनाची तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त सायन्स स्पर्धा परीक्षेची पुस्तके व इतर शास्त्रज्ञांची पुस्तके प्रदर्शनात मांडली होती. या प्रदर्शनास प्राध्यापक व प्रशासकीय सेवक वृंद विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला. ग्रंथ प्रदर्शन यशस्वीतेसाठी सविता डांगे, चेतन साळवे, शिवाजी सातपुते, श्रीराम बनसोड, के. एन. मते व ग्रंथालय सेवकवृंद यांनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.