आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्तार:कोरोनानंतर नवीन बांधकामांना बुस्ट; चालू वर्षात परवानग्यांच्या संख्येत घट

नगर / मयूर मेहता16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहराच्या उपनगर परिसराचा झपाट्याने विस्तार होत आहे. नवनवीन वसाहती निर्माण होत आहेत. परिणामी शहरातील इमारतींची संख्याही वाढत आहे. कोरोना काळात नवीन इमारतीच्या बांधकामांना काही प्रमाणात ब्रेक बसला होता. मात्र त्यानंतर पुढच्याच वर्षी बांधकाम क्षेत्राला सुगीचे दिवस आले होते. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षात नवीन इमारतींच्या बांधकाम परवानगीच्या संख्येत पुन्हा घट झाली आहे. दरम्यान, नगररचना विभागामार्फत महापालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नात मात्र मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे.

मागील अडीच वर्षात प्रशासनाने तब्बल दीड हजारहून अधिक नवीन इमारतींच्या बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे. तर नव्याने १६१ लेआऊट मंजूर करण्यात आले आहेत. २०२०-२०२२ मध्ये कोरोना लॉकडाऊन काळात बांधकाम परवानगी व नवीन लेआऊटच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, सन २०२१-२०२२ मध्ये यात ३० टक्क्यांनी वाढ झाली. २०२०-२०२१ नंतर मागील दीड वर्षात नवीन लेआऊटच्या मंजुरीमध्येही दुप्पट वाढ झाली आहे. चालू वर्षातील ७ महिन्यात केवळ १८६ बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या आaहेत. त्यामुळे मागील वर्षभरातील ही संख्या अवघी २५ टक्केच आहे.

‘नगररचना’च्या माध्यमातून मनपाला ९० कोटींचे उत्पन्ननगररचना विभागाच्या माध्यमातून मिळणाऱ्या बांधकाम परवानगी, विकास भार, विकास परवाने, उपकर, प्रीमियम, लेआउट मंजुरी, अंतर्गत सुधारणा अशा उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. अडीच वर्षात सुमारे ९० कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. चालू वर्षातील सात महिन्यात बांधकाम परवानग्यांची संख्या कमी असली, तरी प्रीमियम, विकास भार व लेआऊट मंजुरीच्या माध्यमातून सुमारे साडेपंधरा कोटींचे उत्पन्न मिळाले आहे.

कोट्यवधींचे उत्पन्न; पण तरीही सुविधांचा अभावलेआऊट मंजूर केलेल्या क्षेत्रात पायाभूत सुविधा देणे ही मनपाची जबाबदारी आहे. अडीच वर्षात मनपाला प्रीमियमपोटी १५.९८ कोटी, विकासभार २२.२६ कोटी व रेखांकन सुधारणा पोटी ६.९० कोटी रुपये मिळाले आहेत. मात्र, अद्यापही विस्तारीत भागात पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

मोबाईल टॉवरच्या उत्पन्नात घटमोबाईल टॉवर उभारणीसाठी प्रशासकीय शुल्क व दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. सन २०-२१ मध्ये मनपाला सुमारे २४ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. त्यानंतर दीड वर्षात अवघे ८.६० लाख रुपये उत्पन्न मिळाले. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मोबाईल टॉवर असतानाही त्यावर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.

बातम्या आणखी आहेत...