आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीमा वादाचा साईबाबांच्या भाविकांना फटका:कर्नाटकाहून शिर्डीकडे येणाऱ्यां भाविकांची संख्या रोडावली; बसेसमध्ये गर्दी अल्पच

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिणेतील आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून दररोज मोठ्या संख्येने भाविक अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येतात ,मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून महाराष्ट्र व कर्नाटक सीमावाद सुरू असल्यामुळे शिर्डी व शनिशिंगणापूरला येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात रोडवली आहे.

मंगळवारी (20 डिसेंबर) ला कर्नाटकाहून शिर्डीकडे जाणाऱ्या हुबळी- शिर्डी या कर्नाटक मंडळाच्या बसमध्ये अल्प प्रमाणात गर्दी होती. कर्नाटकाहून जाणाऱ्या सर्व बसेस अहमदनगरच्या तारकपूर आगारातून शिर्डीकडे जातात.

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरू झाल्यापासून कर्नाटकाहून शिर्डी कडे येणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस पंधरा दिवसांसाठी बंद झालेले होत्या. नुकत्याच काही प्रमाणात कर्नाटकाहून येणाऱ्या बसेस सुरू झालेल्या आहेत. कर्नाटक राज्यातून शिर्डी व शनिशिंगणापूर कडे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. पंधरा दिवसापासून या बसेस बंद असल्यामुळे अनेक भाविक शिर्डी व शनिशिंगणापूरला येऊ शकले नाहीत. गेल्या दोन दिवसापासून कर्नाटकाहून शिर्डीकडे येणाऱ्या कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसेस पुन्हा सुरू झाले आहेत. मात्र या बसेस मध्ये प्रवाशांची अत्यंत अल्प प्रमाणात गर्दी दिसून आली. मंगळवारी अहमदनगरच्या तारकपूर बस स्थानकात कर्नाटकातील हुबळी येथून आलेल्या परिवहन मंडळाच्या बस मध्ये अत्यंत कमी प्रमाणात प्रवासी दिसून आले.

10 बसेस शिर्डीकडे

कर्नाटकाहून शिर्डीकडे जाणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेस ला अहमदनगर शहरातून जावे लागते. अहमदनगर शहरातील तारकपूर आगारातून कर्नाटक राज्यातून येणाऱ्या दररोज दहा बसेस शिर्डीकडे जातात.

सीमावाद सुरू होण्यापूर्वी कर्नाटकाहून येणाऱ्या परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये गर्दी होती, मात्र हा वाद सुरू झाल्यापासून गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...