आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र अंतर्गत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून राहुरी कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्प येथे पहिल्या गीर जातीच्या कालवडीचा जन्म झाला आहे.
पुणे कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागात कार्यरत असलेल्या या प्रकल्पातील प्रगत तंत्रज्ञानाचा वापराचा प्रारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२१ मध्ये करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकरांच्या गोठयात भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. संकरित गायीच्या माध्यमातून या तंत्रज्ञानात वापर करून पहिल्या गीर जातीच्या कालवडीचा जन्म राहुरी कृषी विद्यापीठातील गो संशोधन व विकास प्रकल्प येथे झाला आहे. या कालवडीचे वजन २२.९ किलो भरले आहे.
या प्रकल्पांतर्गत साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. एनडीडीबी राहुरी यांच्या मार्फत राबवण्यात येत असलेल्या या तंञज्ञानातुन उच्च वंशावळीचा देशी गोवंशाची संख्या वाढवणे तसेच संवर्धनासाठी मोठी मदत होणार आहे.हा प्रकल्प यशस्वीतेसाठी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने, डॉ. धीरज कणखरे, विभाग प्रमुख, डॉ. विष्णू नरवडे, डॉ. प्रमोद साखरे,डॉ. सुनील अडांगळे, एनडीडीबीचे डॉ. शिवकुमार पाटील काम पाहत आहेत.
तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत जाणे गरजेचे
सध्या देशातील शुद्ध देशी गोवंशाची घटती संख्या पाहता जलदगतीने गायींची संख्या वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही. या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांच्या घरापर्यंत होणे गरजेचे आहे. देशात एकूण संख्येपैकी ७५ टक्के गाई गावठी स्वरपात आढळत आहेत. २५ टक्के गायी शुद्ध स्वरूपातील आहेत. भविष्यात उच्च दर्जाच्या गायी तयार करण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान ही काळाची गरज असेल.'' डाॅ.प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.