आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालपाणी:रक्तदाता आणि ज्ञानदाता दोघेही समाजासाठी उपकारक ; रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले

संगमनेर10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक भावनेतून केलेले कृत्य नेहमीच सत्कारणी लागते. रक्तादानाला तर जगात सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. आपल्या दातृत्त्वातून एखाद्या रुग्णाचा जीव वाचावा यापेक्षा मोठे पुण्यकर्म कोणते असू शकत नाही. ज्ञानाचा साठा दिल्याने वाढतो, तसाच शरीरातील रक्ताचा साठाही दिल्याने वाढतो. दिल्याने वाढते याचा सुंदर अनुभव रक्त आणि ज्ञान देणार्‍यांना मिळतो. त्यामुळे रक्तदाता आणि ज्ञानदाता दोघेही समाजासाठी उपकारक असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुनीता मालपाणी यांनी केले.

उद्योजक स्व. दामोदर मालपाणी यांच्या ४७ व्या पुण्यस्मृती दिनानिमित्त मालपाणी उद्योग समूहाने अर्पण रक्तपेढीच्या सहकार्याने कर्मचाऱ्यांसाठी शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, याप्रसंगी मालपाणी बोलत होत्या. सोनिया मालपाणी, प्रफुल्ल खिंवसरा, रमेश घोलप, शिवाजी आहेर, देवदत्त सोमवंशी, रवींद्र कानडे, प्रदीप कानवडे, अर्पणचे संचालक डॉ. नयन जैन, डॉ. रोहिणी काकड, प्रमिला कडलग यावेळी उपस्थित होते.

मालपाणी म्हणाल्या, रक्तदान म्हणजे जीवदान देण्यासोबतच नाते जोडणारे अनोखे दान आहे. रक्तदानात रुग्णाला संजीवनी देण्याचे सामर्थ्य तर आहेच, पण नाते जोडण्याची किमयाही त्याच्या अंगी आहे. ज्ञानदानाने मन निरोगी, शांत, समाधानी व समृद्ध होते. रक्तदानाने शरीर निरोगी व सुदृढ होण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. सोनिया मालपाणी यांनी देशभरात दररोज होणारे अपघात आणि त्यातून केवळ रक्त न मिळाल्याने जीव जाणार्‍यांची संख्या लक्षणीय असल्याचे सांगून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमातून मालपाणी उद्योग समूह सातत्याने समाजसेवेचा वारसा जोपासत आहे. ४७ वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमात यावर्षी ९३ रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याचे व्यवस्थापक घोलप यांनी सांगितले. संतोष राऊत यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...