आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास सुरू:सावली बालगृहातून मुलगा बेपत्ता; गुन्हा दाखल

नगर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगाव येथील सावली बालगृहातून एक १७ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात वसतिगृहाचे अधीक्षक अजिंक्य दिलीप आंधळे (वय २७) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केडगाव परिसरात संकल्प प्रतिष्ठान संचलित सावली बालगृह आहे. २२ जून रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान बेपत्ता झालेला मुलगा पुरी नाष्टा करण्यासाठी मेसमध्ये आला नसल्याची माहिती केअर टेकर अर्चना मंडलिक यांनी अधीक्षक आंधळे यांना दिली. त्यानंतर अधीक्षक आंधळे यांच्यासह केअर टेकर मंडलिक यांनी संस्थेचा परिसर, केडगाव परिसर, रेल्वे स्टेशन, बसस्थानक आदी ठिकाणी पुरी याचा शोध घेतला. तो मिळून न आल्याने कोतवाली पोलिस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध त्याला पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. कोतवाली पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...