आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विषाणुजन्य सांसर्गिक रोग:गोवंश व म्हशींच्या बाजारांना ब्रेक ; जनावरांच्या शर्यतीवरही निर्बंध

नगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लम्पी हा विषाणुजन्य सांसर्गिक रोग असून या रोगाच्या नियंत्रण व निर्मुलनासाठी, जिल्हा नियंत्रीत क्षेत्र म्हणून घोषीत करत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केले आहेत. जिल्ह्यात जनावरांचे बाजार भरवण्यासही ब्रेक लागला आहे. तसेच या जनावरांच्या शर्यतीवरही निर्बंध असणार आहेत.

गोवंश व म्हैसवर्गीय पशुधनात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव वाढत असून, काही ठिकाणी मृत्यू देखील झाले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ८ सप्टेंबर, २०२२ च्या अधिसूचनेनुसार प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण कायद्यांतर्गत लम्पी नियंत्रित क्षेत्र म्हणून संपुर्ण राज्य घोषीत केले आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात, लम्पी बाधीत जनावरांची वाहतूक केल्यास निरोगी जनावरांना बाधा होऊ शकते.

लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रणासाठी गायी व म्हशी पाळले अथवा ठेवले जातात, त्या ठिकाणापासुन नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात आली आहे. गोवंश व म्हशींचा बाजार भरवणे तसेच शर्यती, प्राण्यांचे प्रदर्शन करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातीच्या प्राण्याचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम घेण्यास बंधन घालण्यात आली आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभाग, पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आदी प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

जनावरांचे १० बाजार
जिल्ह्यात वाळकी, अकोले, राजूर, लोणी, घोडेगाव, काष्टी, राशिन, मिरजगाव तसेच कोपरगाव व राहुरी येथील जनावरांचे बाजार प्रसिद्ध आहेत. आता गोवंशीय व म्हशींच्या बाजारावरच निर्बंध आल्याने हे सर्व बाजार बंद होणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...