आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात अग्नितांडव:नगरच्या जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये भीषण आग; आग विझवण्याचे काम सुरू असतानाच 11 जण दगावले, रुग्णांना पुण्यात हलवले

अहमदनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला शनिवारी सकाळी अचानक भीषण आग लागली. आग लागली तेव्हा आयसीयूत जवळपास 20 जण होते. ही आग आटोक्यात आणेपर्यंत या विभागात उपचार घेत असलेले 11 रुग्ण दगावले आहेत. तसेच इतर काही रुग्ण भाजून जखमी झाले आहेत. गंभीर रुग्णांना आता पुण्यात हलवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयात असलेला अतिदक्षता विभाग रुग्णालयाच्या अत्यंत मध्यभागी आहे. या विभागात जवळपास वीस रुग्णांवर उपचार सुरू होते. शनिवारी सकाळी या विभागात आग पसरल्याने एकच धावपळ उडाली. रुग्णालयातील अग्निशमन यंत्रनेचा वापर करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.

त्यामुळे अहमदनगर महापालिका तसेच एमआयडीसी अग्निशमन विभागाची वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. या वाहनांनी यावेळी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आग आटोक्यात आल्यानंतर अग्निशमन विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी तसेच रुग्णालयाचे व्यवस्थापन अतिदक्षता विभागापर्यंत पोहोचले.

तोपर्यंत संपूर्ण अतिदक्षता विभाग आगीत भस्मसात झाला होता.प्राथमिक माहितीनुसार या आगीत 14 ते 15 रुग्ण भाजून गंभीर जखमी झाले. आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

आगीत मृत्यूमुखी पावलेल्यांची आणि उपचारासाठी दाखल रुग्णांची नावे समोर आली आहेत.

रुग्णालयातील बेजबाबदारपणाच्या 4 घटना

1. महाराष्ट्रात यापूर्वी एप्रिलमध्ये मुंबईला लागून असलेल्या विरार पश्चिम येथे विजय वल्लभ कोविड रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत 13 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. रुग्णालयातील ICU मध्ये असलेल्या AC चा स्फोट झाल्यानंतर ही घटना घडली होती.

2. जानेवारी 2021 मध्ये भंडारा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयामध्ये लहान मुलांच्या आयसीयूत आग लागली होती. यामध्ये 10 नवजातांचा बळी गेला होता. वार्डमध्ये एकूण 17 चिमुकले होते, त्यातील 7 जणांना वाचवण्यात आले होते.

3. मुंबईतील भांडूप परिसरात एका मॉलमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या कोविड रुग्णालयात आग लागली होती. या घटनेत 10 जणांच्या मृत्यूची नोंद आहे.

4. नाशिकच्या सरकारी रुग्णालयात ऑक्सिजन टँक लीक झाल्यामुळे कोरोनावर उपचार घेणाऱ्यांचे ऑक्सिजन 30 मिनिटे बंद पडले होते. यातून 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...