आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमर्स:कॉमर्स विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्याच्या संधी : काचवाला

नगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉमर्स शाखा ही नवीन युगात प्रचंड वाढणारी व सर्वच क्षेत्रात विद्यार्थ्यांना नवीन संधी निर्माण करून देणारी शाखा आहे. विद्यार्थ्यांना या शाखेच्या अभ्यासातून मिळणाऱ्या संधी कोणत्या आहेत. याची कल्पना नसते. गेल्या काही वर्षांत वाढते व्यापारीकरण आणि त्यामाध्यमातून उपलब्ध होणारा रोजगार हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अकौंटंट ते सीए याच बरोबर सॉफ्टवेअर प्रॉग्रामर यांनीही भविष्यात मोठी संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे पुढील काळात कॉमर्स प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थीची चढाओढ लागेले, असे प्रतिपादन सीए इन्स्टिट्यूटचे पश्चिम प्रांत चेअरमन सीए मुर्तुझा काचवाला यांनी केले.

पेमराज सारडा महाविद्यालयातील अकरावी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभानिमित्त इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटतर्फे ‘सीए सोबतच इतर करिअरच्या संधी’ या विषयी सीए काचवाला यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्हाईस चेअरमन सीए यशवंत कासार, सेक्रेटरी सीए श्वेता जैन, खजिनदार सीए पियुष चांडक, हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, ज्यू.कॉलेज कमिटी चेअरमन सुमतीलाल कोठारी, अजित बोरा, अनंत देसाई, प्राचार्य डॉ. आर. वाय. शिंदे आदि उपस्थित होते.

सर्वसामान्य विद्यार्थी देखील अभ्यास करून सीए परीक्षा पास होऊ शकतो असा विश्वास सीए मुर्तुझा यांनी दिला. याप्रसंगी अहमदनगर शहरात सीए परीक्षेकरिता परीक्षा केंद्र म्हणून इथून पुढे पेमराज सारडा कॉलेजची निवड इन्स्टिट्यूटतर्फे केली, असे त्यांनी जाहीर केले.

बातम्या आणखी आहेत...