आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर विविध क्षेत्रातील तज्ञांनी प्रतिक्रिया दिल्या असून,कॉर्पोरेट कंपन्यांचे उत्पन्न दुप्पट करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ. अजित नवले यांनी बुधवार ( १ फेब्रुवारी) ला दिली. तर स्वतंत्र भारत पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या साकार न होणाऱ्या स्वप्नासारखा आहे, अशी प्रतिक्रिया दिली. देशांतर्गत वास्तवाचे भान ठेवून विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया सीए अशोक पितळे यांनी दिली.
देशांतर्गत वास्तवाचे भान ठेवून विकासाकडे नेणारा अर्थसंकल्प: सीए अशोक पितळे
जागतिक परिस्थिती व अर्थकारणाचे तसेच देशांतर्गत वास्तवाचे भान ठेवून कुठेही वाहवत न जाता अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाचे स्वागत आहे. भांडवली गुंतवणूक दहा लाख कोटी तसेच रेल्वे वाहतुकीचे वेगवेगळे प्रकल्प विमानतळे, बंधारे, यांच्या निर्मितीसाठी देखील मोठी तरतूद करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात लघुउद्योगांकडे दुर्लक्ष: राजेंद्र कटारिया
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात लघु उद्योगांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सूक्ष्म लघु उद्योगासाठी मात्र आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. पंतप्रधान आवास योजनेचा कामगार व कर्मचाऱ्यांना फायदा होईल. कराची मर्यादा ७ लाख केल्याचा कर्मचाऱ्यांना फायदा होईल. अशी प्रतिक्रिया आमी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कटारिया यांनी दिली.
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प - अरुण मुंढे
उत्पन्नावरील कर सवलतीची मर्यादा वाढवून देशातील कोट्यवधी कुटुंबाना आर्थिक स्थैर्याची ग्वाही दिल्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासातील सर्वसामान्य जनतेचा सहभाग सुनिश्चित केला आहे, अशा शब्दांत भाजपा चे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी प्रतिक्रिया दिली.
अमृतमहोत्सवी काळातील बजेट - भय्या गंधे
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैया गंधे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सादर केलेले देशाच्या अमृतमहोत्सवी काळातील बजेट हे समाजातील सर्व स्तरांचा विचार करुन राष्ट्राला सर्वांगीण उन्नतीकडे नेणारे आहे. अशी प्रतिक्रिया दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.