आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद शिक्षण विभाग लक्ष ठेऊन:खासगी अनुदानित शाळांमध्ये उपक्रम शुल्कांचा पालकांवर बोजा; तक्रार आल्यास होणार चौकशी

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील काही खासगी अनुदानित शाळांमध्ये राबवल्या जात असलेल्या उपक्रमांच्या आडून भरमसाठ शुल्क वसुली केली जात असल्याचे जिल्हा परिषदेच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणात तक्रार दाखल झाल्यास चौकशी करून तथ्य आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.जिल्हाभरात जिल्हा परिषदेच्या सुमारे साडेतीन हजार प्राथमिक शाळा आहेत, याव्यतिरिक्त अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यीत शाळांचीही संख्या मोठी आहे. शाळांमध्ये आकारल्या जाणाऱ्या शुल्काबाबत स्वतंत्र अधिनियम आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या शुल्काचे विनियमन करण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था अधिनियम २०११ पारीत करण्यात आला होता.

या अधिनियमात अनुदानित तसेच विनाअनुदानीत शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. या कायद्याच्या प्रकरण दोन मध्ये जास्तीचे शुल्क आकारण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कलम ५ नुसार शासकीय शाळा व अनुदानीत शाळांचे शुल्क प्रस्तावित करण्यासाठी शासन सक्षम असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, नियमांना हरताळ फासून विविध शालेय साहित्यांच्या नावाखाली मनमानी पद्धतीने शुल्क वसूल केले जात असल्याची चर्चा पालकांमध्ये सुरू आहे. यासंदर्भात दिव्य मराठीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद साधला, असता त्यांनी, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पावले उचलणार असल्याचे सांगितले. प्रत्येक शाळेत अस्तित्वात असलेल्या मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीसमोर शुल्क आकारणीचा विषय मांडून मंजुरी घ्यायला हवी.

प्राथमिक शाळेत प्रतिविद्यार्थी अडीच ते तीन हजारांचे शुल्क
तक्रार आल्यास लगेच चौकशी अनुदानीत शाळांनी अनावश्यक शुल्क आकारणी केली असेल व पालकांची याबाबत तक्रार असेल तर तातडीने तालुक्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. तक्रार आल्यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अशा शाळांची चौकशी केली जाईल.
भास्कर पाटील, जिल्हा शिक्षणाधिकारी. (प्राथमिक)

असा आहे उपक्रम शुल्काचा तक्रार
मासिक गृहपाठ, वार्षीक स्नेहसंमेलन, पालक शिक्षक संघ वर्गणी (ग्रामीण भागात २० अपेक्षीत असताना ५० रू. आकारणी), प्रश्नपेढी संच, दिवाळी गृहपाठ, पुन्हा एक स्वतंत्र गृहपाठ शुल्क, संगणक, स्वच्छता मानधन आदींसाठी प्रतिविद्यार्थी तब्बल अडीच ते तीन हजार शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत.

बातम्या आणखी आहेत...