आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:वकिलाच्या घरी चोरी; सव्वा दोन लाखांचा ऐवज लंपास

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केडगावमधील अंबिकानगर येथे एका वकिलाच्या घराच्या मागील दरवाजातून प्रवेश करीत कपाटातील सोने व रोख रक्कम अज्ञाताने चोरुन नेल्याची घटना घडली. यात २ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.

या प्रकरणी धनंजय नारायण लोकरे (रा. अंबिका शाळेजवळ, केडगाव) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २ डिसेंबरला रात्री ही घटना घडली. १ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ४१ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, २५ हजार रुपयांचे कानातील सोन्याचे लटकन,१६ हजार रुपयांची अंगठी, ९ हजार रुपये किमतीची अंगठी, १८ हजार रुपये किमतीची अंगठी, ९ हजार रुपयांच्या सोन्याच्या बाळ्या, ८ हजार ५०० रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख २९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

बातम्या आणखी आहेत...