आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:गुलमोहर रस्त्यावर भिंगारदिवे मळ्यात भरदिवसा घरफोडी

नगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुलमोहर रस्त्यावरील अशोकनगर, भिंगारदिवे मळा येथे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करत आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. शुक्रवारी ही घटना घडली. या प्रकरणी शनिवारी उशिरा तोफखाना पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.जयगोपाल बालमुकुंद वर्मा (रा. अशोकनगर, भिंगारदिवे मळा, गुलमोहर रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.

वर्मा हे व्यावसायिक असून ते व्यावसायानिमित्त पुणे येथे राहतात. त्यांची पत्नी एमआयडीसी येथील एका बँकेत नोकरीस असल्याने त्या नगरमध्येच राहतात. शुक्रवारी त्या घर बंद करून ड्यूटीला गेल्या असताना चोरट्यांनी डाव साधला. सायंकाळी साडेपाच वाजता त्या घरी आल्या तेव्हा त्यांना घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसून आली. त्यांनी पती वर्मा यांना फोन करून माहिती दिली. चोरट्यांनी सामानांची उचकापाचक करून १२ हजार रूपये रोख, दोन सोन्याच्या बांगड्या, तीन सोन्याचे मंगळसूत्र व दोन तोळ्याची चैन असा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...