आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी:बुऱ्हाणनगरला पाणी योजनेच्या जलवाहिनीला साडेसाती ; गॅसलाइनचे काम करणारे कामगार पळाले

नगर तालुका22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या चार दिवसांपासून बुऱ्हाणनगर पाणी योजनेला पाणी पुरवठा करणारी पाण्याची पाइपलाइन विळद ( ता. नगर ) येथे गॅस लाईन टाकणाऱ्या कामगारांनी फोडून ठेवली. बुऱ्हाणनगर पाणी योजनेतील गावांमध्ये पाण्याचा ठणठणाट झाल्याने शिवसेना आक्रमक झाली. आज मंगळवारी संदेश कार्ले व त्यांचे सहकारी शिवसैनिक या कामाची पाहणी करण्यासाठी जात असल्याचे समजताच शिवसेनेचे आक्रमक रूप पाहून मनमाड रस्त्यावर नांदगाव, देहरे, विळद येते काम करणारे गॅस लाईनचे काम करणारे कामगारांनी धूम ठोकली. मागील आठवड्यात सोलापूर रस्त्यावर शिराढोण येथे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन रस्त्या कामामुळे फुटली होती. त्या भागात पाईपलाईन फुटण्याची ही पन्नासावी घटना होती.त्यामुळे दोन महिन्यात अवघ्या १० ते १२ दिवस या भागातील गावांना पाणीपुरवठा झाला होता.त्या विरोधात जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसैनिक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.ती दुरुस्ती होत नाही तोपर्यंत नगर मनमाड रस्त्यावर पुन्हा विळद भागात पुन्हा पाईपलाईन फुटली.चार दिवसांनातरही ती दुरुस्ती झाली नाही .त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले होते. जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले , तालुका प्रमुख राजेंद्र भगत विश्वास जाधव , उप तालुका प्रमुख प्रकाश कुलट, यांनी स्थानीक नागरिक व शिसैनिकांच्या मदतीने मनमाड रस्तायावर फुटलेल्या या बुऱ्हाणनगर पाणि योजनेच्या पाईप लाईनचे तातडीने दुरूस्तीस सरवात केली असून उद्या बुधवार पर्यंत बुऱ्हाणनगर याजनेतील ४४ गावांचा पाणि पुरवठा सुरू करणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद, मनमाड, सोलापूर रस्त्यावर गॅसचे काम करणारी ठेकेदार कंपनी करतेय नागरिकांची अडवणूक.. गेल्या चार महिण्यात वेगवेगळ्या महामार्गामगत गॅस लाईन टाकण्याचे काम करणाऱ्या या कामगार एजन्सींने या पाण्याच्या पाईप लाईन फोडून ठेवल्या आसून परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना अरेरावीची करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...