आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:पुतळ्याचे दहन करून खा. राऊत यांचा निषेध

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे रोज काही ना काही वादग्रस्त भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीचा मुंबईतील हल्लाबोल मोर्चा पूर्णतः अपयशी ठरला. मुंबई आमचीच आशा वल्गना करणाऱ्या उद्धवसेनेला ही मोठी चपराक आहे. या वैफल्यातूनच राऊत यांनी २०१७ साली मुंबईत निघालेल्या ऐतिहासिक मराठा क्रांती मोर्चाचा हा व्हिडिओ टाकून दिशाभूल केली.

मराठा क्रांती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जातीसमूहांच्या जखमेवर मीठ चोळल्याचा आरोप करत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन करून निषेध केला.यावेळी जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, बाबुशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, संपर्क प्रमुख सचिन जाधव, अमोल पाठक, सोमनाथ माने, लालाभाई शेख, बाबू भोर, गोरख आढाव, अमोल पाठक, शुभम भोंदे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...